...म्हणून बोलताना काळजी घ्यावी लागते : शरद पवार

'आपली विश्वासार्हता टिकवायची असेल तर तुम्हा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. असं मी माझ्या पक्षातील सर्व नव्या लोकांना सांगत असतो.’

...म्हणून बोलताना काळजी घ्यावी लागते : शरद पवार

मुंबई : ‘इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे बोलताना फार काळजी घ्यावी लागते.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. काल (गुरुवार) टीव्हीजेएच्या कार्यालयाला शरद पवारांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

‘म्हणून जपून बोलवं लागतं...’

‘एखाद्या दिवशी आमच्याकडून काही चूक झाली तर दुसऱ्या दिवशी त्याची वर्तमानपत्रातून चर्चा झाल्यास आम्ही लोक कदाचित बोलू शकतो. पण इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर बोलणं धोक्याचं असतं. कारण तुम्ही ते शूट करुन घेतलेलं असतं. त्यामुळे मी जर दुसऱ्या दिवशी बोललो की, माझा तसा हेतू नव्हता तर तुम्ही आज काय बोललो आणि काल काय बोललो हे दोन्ही दाखवता. त्यामुळे आपली विश्वासार्हता टिकवायची असेल तर तुम्हा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. असं मी माझ्या पक्षातील सर्व नव्या लोकांना सांगत असतो.’ असं पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी भाजप सरकारवर टीकाही केली. शेतीमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. असं म्हणत त्यांनी सरकार निशाणा साधला.

VIDEO : 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Care has to be taken whenever talk because of electronic media said Sharad pawar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV