मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप

इंजिनमध्ये पाणी शिरल्याने हे जहाज बुडालं.

मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप

मुंबई : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मालवाहू जहाज मुंबईजवळच्या समुद्रात बुडालं आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणाऱ्या या जहाजातील सर्व 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने हे जहाज बुडालं.

जहाज बुडायला सुरुवात झाली तेव्हाच बाजूने एक जहाज जात होतं. त्या जहाजातील कर्मचाऱ्यांना हे जहाज बुडताना दिसताच त्यांनी या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचवलं.

विशेष म्हणजे हे बुडालेलं जहाज केवळ पाच वर्षे जुनं आहे. सायंकाळी 5 वाजता इंजिनमध्ये पाणी भरायला सुरु झालं आणि रात्री 8 वाजता हे जहाज पूर्णपणे पाण्यात बुडालं. दरम्यान 16 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cargo ship sank near Mumbai, all 16 staffs safe
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: ONGC ship ओएनजीसी जहाज
First Published:

Related Stories

LiveTV