महाशिवरात्रीनिमित्त देशभर उत्साह, पुण्यासह नाशकातही भक्तांची मांदियाळी

देशभरात आज (मंगळवार) सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे.

महाशिवरात्रीनिमित्त देशभर उत्साह, पुण्यासह नाशकातही भक्तांची मांदियाळी

मुंबई : देशभरात आज (मंगळवार) सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. औरंगाबादमधील घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. तर पहाटे विधीवत दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे.

तर मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आणि पुण्याच्या भीमाशंकर मंदिरातही भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. रात्री पासून देशभरात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.

आज देशभरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणांना भेट देतात. यावेळी शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकही करण्यात येतो. तसंच  बेलाची पानं देखील शिवलिंगावर अर्पण केली जातात.

महाशिवरात्रीनिमित्त आज देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: celebration across the country on the occasion of Mahashivaratri latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV