कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

वाढदिवसाचं बॅनर ओव्हरहेड वायरवर पडून त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

कल्याण : कसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. शहाड - आंबिवलीदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून कल्याण-कसारा वाहतूक पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक एक्स्प्रेस गाड्या रखडल्या आहेत.

सुट्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे. शिवाय गर्दीची वेळ आहे, अनेक प्रवासी कामाहून घरी परतत असताना वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठाणे, मुंबई शहर-उपनगरांमधे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वाढदिवसाचं बॅनर वादळी पावसामुळे ओव्हरहेड वायरवर पडलं. हे बॅनर पडल्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला.

रखडलेल्या एक्स्प्रेस गाड्या

  • मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस

  • मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस

  • टिटवाळा लोकल

  • आसनगाव लोकल


या गाड्या सध्या एका रांगेत उभ्या आहेत. टिटवाळा आणि आसनगाव लोकल कल्याण स्थानकात रद्द करण्यात आली. तर कल्याणहून 9.55 ची कसारा लोकल अजूनही आऊटरलाच आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV