मुंबई फिरायला आलेल्या दोघांकडून 9 सोनसाखळ्यांची चोरी

चौथा आरोपी अजूनही फरार असून त्याच्या नावावर दिल्ली पोलिसात 75 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.

मुंबई फिरायला आलेल्या दोघांकडून 9 सोनसाखळ्यांची चोरी

मिरा रोड : दिल्लीहून मुंबई फिरण्यासाठी आलेल्या अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार दिवसात दोघांनी नऊ सोनसाखळ्या चोरल्या होत्या.

आकाश लाल आणि भीकू हे आपल्या नातेवाईकांकडे मुंबई फिरण्यासाठी आले होते. मिरा रोडमध्येच राहणाऱ्या आकाश सिंह आणि विमल सिंह या दोघांच्या मदतीनं भीकूनं बाईक विकत घेतली. चारच दिवसात त्यांनी 9 सोनसाखळ्या चोरल्या.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आकाश सिंह आणि विमल सिंह यांना पकडण्यात आलं. तर आकाश लाल यालाही पोलिसांनी दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या. या तिघांकडून पोलिसांनी 175 ग्रॅम सोनं हस्तगत केलं आहे.

चौथा आरोपी भिकू अजूनही फरार आहे. त्याच्या नावावर दिल्ली पोलिसात 75 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chain snatchers of Delhi looted gold chains in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV