चर्नी रोड स्टेशनची दुरावस्था, 'आम्ही गिरगावकरांचं' टोमणे मारा आंदोलन

चर्नीरोड स्टेशनच्या पूर्वेला बाहेर पडण्यासाठी पादचारी पुलाची सत्य परिस्थिती पथनाट्याच्या माध्यमातून मांडण्यात आली.

चर्नी रोड स्टेशनची दुरावस्था, 'आम्ही गिरगावकरांचं' टोमणे मारा आंदोलन

मुंबई: एलफिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी "आम्ही गिरगावकर" यांच्या वतीने टोमणे मारा आंदोलन करण्यात आलं.

चर्नी रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर हे आंदोलन करण्यात आलं. चर्नीरोड स्टेशनच्या पूर्वेला बाहेर पडण्यासाठी  पादचारी पुलाची सत्य परिस्थिती पथनाट्याच्या माध्यमातून मांडण्यात आली.

चर्नी रोड स्टेशनच्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट असून पुलावरची फरशी आणि रेलिंग्स निघाल्या आहेत.

याबाबत रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करुन देखील कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गिरगावकर ग्रुपच्यावतीने करण्यात आली.

चर्नी रोड स्टेशनच्या पुलाची अवस्था अत्यंत बिकट असून पुलावरची फरशी उखडली आहे, रेलिंग्स निघाल्या आहेत. त्यासोबतच जवळच शाळा, कॉलेजस असल्यामुळे हा पादचारी पूल वर्दळीचा असून, रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा याबाबत तक्रार केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही दुरुस्ती झालेली नाही.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाला जागं करण्यासाठी 'आम्ही गिरगावकर' ग्रुपने अनोखं आंदोलन केलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: aamhi Girgaonkar charni road street play
First Published:

Related Stories

LiveTV