सततच्या आगींमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय?

सततच्या आगीमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या परिसरातल्या केमिकल कंपन्या सातत्यानं आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने भिवंडीतील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

chemical company fire in bhiwandi

भिवंडी : सततच्या आगीमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या परिसरातल्या केमिकल कंपन्या सातत्यानं आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने भिवंडीतील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

भिवंडीत आज पूर्णा गावातील श्रीराम कंपाऊंडमधल्या रौनक वेअरहाऊस या केमिकल गोदमाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाकडून यश आलं असं सांगण्यात येत होतं. पण अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं नसल्याचं सांगण्यात येत होतं.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यातच केमिकलमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचीही माहिती आहे.

या आधीही फेब्रुवारीमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत चारजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. तर 3 मार्च रोजी एका कापडाच्या मिलला भीषण आग लागली होती. 2014 मध्ये तर एका लाकडी गोदामाला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

वास्तविक, भिवंडी आणि आसपासच्या परिसरात अनेक केमिकल कंपन्या आहेत. या केमिकल कंपन्यांमध्ये आगीच्या घटना वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासानाची यंत्रणा नाही. आग लागल्यानंतर नेहमी ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी भागातून आग्निशमन दलाला पाचारण करावं लागतं.

त्यामुळे पूर्णा, राहनाळ, काल्हेर, कशेळी, वळ, दापोडे आदी भागातील सुमारे 500 हून अधिक कुटुंबांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं आहे. शिवाय या परिसरात शाळा आणि रुग्णालयांची संख्याही मोठी आहे. तेव्हा प्रशासनानं वेळीच दक्षता घेतली नाही, तर केमिकल गळतीमुळे मोठी दुर्घटना घटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:chemical company fire in bhiwandi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप
एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेली 13 वर्ष सुरु असलेली टोल वसूली

नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!
नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची

कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री
कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री

मुंबई : कर्जमाफीचे फॉर्म ऑगस्टमध्ये जमा करुन छाननी केली जाईल.

मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली
मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली

मुंबई : मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली.

अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे
अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला मागील

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट
विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट

मुंबई: ‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि

देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी
देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी

मुंबई : राज्यात ‘वंदे मातरम्’च्या सक्तीच्या मागणीवरुन मोठा वाद

2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री
2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री

मुंबई: यूपीए सरकारने 2008-09 मध्ये केलेली कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं
वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं

मुंबई : स्वतःच्या देखभाल खर्चासाठी सक्षम असलेल्या वर्किंग वुमन