भुजबळांवर आता केईएम रुग्णालयात उपचार होणार!

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती.

भुजबळांवर आता केईएम रुग्णालयात उपचार होणार!

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलवणार आहे.

जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोटाच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात छगन भुजबळ यांना दाखल केलं जाणार आहे.

भुजबळांना काही झालं तर तुम्ही जबाबदार, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. भुजबळांना योग्य उपचार मिळण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. इतकंच नाही, भुजबळांना काही झालं तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असंही म्हटलं होतं.

अखेर छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यासाठी आर्थर रोड जेल प्रशासन आणि हाटकोर्टाने परवानगी दिली आहे. तसंच डॉक्टरांना अहवाल देण्याचे आदेशही डॉक्टरांना देण्यात आले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chhagan Bhujbal to shift at KEM hospital for further treatment
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV