भुजबळांच्या उपचारावरुन विधानपरिषदेत खडाजंगी

छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयाऐवजी लिलावतीसारख्या खासगी रुग्णालयात उपचार मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

भुजबळांच्या उपचारावरुन विधानपरिषदेत खडाजंगी

मुंबई: तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील उपचाराचा मुद्दा आज विधानपरिषदेत चांगलाच गाजला.

छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयाऐवजी लिलावतीसारख्या खासगी रुग्णालयात उपचार मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

त्यावर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आक्षेप घेतला. रावतेंनी भुजबळ यांचे नाव न घेता, आरोपींना खासगी रुग्णालयात उपचार मिळावे अशी मागणी करणे, हा सरकारी रुग्णालयाचा अपमान आहे, त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करता असा मुद्दा मांडला.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईत येऊन उपचार घेतात, मग गोव्यात चांगली सरकारी रुग्णालयं नाही, असं म्हणायचं का? त्यामुळे मुद्दा चांगली ट्रीटमेंट मिळावी हा आहे, सरकारी रुग्णालयाचा नाही, असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी म्हटलं.

या वादात गोंधळ झाल्याने विधानपरिषदेचं कामकाज 15 मिनिटांकरिता तहकूब करण्यात आलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chhagan Bhujbals treatment issue in Vidhanparishad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV