कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ IT विभागाच्या प्रधान सचिवांना भोवला

विजयकुमार गौतम यांच्याकडे आता वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे

कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ IT विभागाच्या प्रधान सचिवांना भोवला

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आली आहे. सध्या राज्यभर सुरु असलेल्या कर्जमाफीच्या घोळामुळे विजयकुमार गौतम यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

गौतम यांच्याकडे आता वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजयकुमार गौतम यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती होती. मात्र वडिलांच्या प्रकृतीच्या कारणामुळे सुट्टी घेतल्याचा गौतम यांनी खुलासा केला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chief Secretary of IT Department transferred after loan waiving online form issue latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV