11 महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत सेफ्टी पिन अडकली!

मुलगी लहान असल्यामुळे ती फारच अस्वस्थ होत होती. तिला गुंगीचं सौम्य डोस देण्यात आलं. अन्ननलिकेत अडकलेली पिन तोंडातून काढण्यास अडथळा येत असल्यामुळे डॉक्टरांनी लगेचच एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.

11 महिन्यांच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत सेफ्टी पिन अडकली!

भाईंदर : भाईंदरमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या 11 महिन्यांच्या मुलीने खेळताना सेफ्टी पिन गिळल्याने परिस्थिती मोठी चिंताजनक झाली होती. ती चिमुरडी रडूही शकत नव्हती. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलीच्या अन्ननलिकेतून सेफ्टी पिन काढण्यात यश आले.

…अन् पिन गळ्यातून काढली!

भायंदर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या 11 महिन्यांच्या चिमुकलीने 24 नोव्हेंबरला घरामध्ये खेळत असताना सेफ्टी पिन गिळली. त्यानंतर तिला लगेचच मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर लहान मुलांचे गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. ललित वर्मा यांनी ही केस आपल्या हातात घेतली. एक्सरेमध्ये लक्षात आलं की, ही सेफ्टी पिन लहान मुलीने अन्ननलिकेच्या मार्गाने  गिळली. तर या सेफ्टी पिनांची वरील बाजू उघडी असल्यामुळे चिमट्याच्या मदतीने ती काढणं फारच कठीण आहे.

मुलगी लहान असल्यामुळे ती फारच अस्वस्थ होत होती. तिला गुंगीचं सौम्य डोस देण्यात आलं. अन्ननलिकेत अडकलेली पिन तोंडातून काढण्यास अडथळा येत असल्यामुळे डॉक्टरांनी लगेचच एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.

एन्डोस्कोपीच्या मदतीने प्रथम ती पिन अन्ननलिकेतून पोटात घेतली आणि नंतर ती पिन उलटी केली म्हणजेच तिचा पाठचा भाग वरती आणला, रॅट टूथ व हूड च्या सहाय्याने अन्ननलिकेतून बाहेर काढली. ही सेफ्टी पिन काढल्यानंतर मुलीला 24 तास निरिक्षणाखाली ठेवलं आणि त्यानंतर तिला घरी ही सोडण्यात आलं.

सिटी स्कॅन व स्कोप केल्यानंतर मुलीला कोणताही गंभीर इजा झाली नव्हती व योग्य व तत्काळ उपचारांच्या मदतीने तिचे प्राण वाचवण्यात आल होतं.

“मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये लहान मुलांनी  पेन्सिल अथवा खोडरबर गिळणे अथवा छोटी बॅटरी अन्ननलिकेत  अडकणे अशा अनेक केसेस ठाणे व पालघर जिल्ह्यातून येत असतात. परंतु अशा प्रकारे सेफ्टी पिन गळ्यात अडकण्याची ही पहिलीच केस असून, तिच्यावर आम्ही  यशस्वी उपचार केले आहेत. अशा केसेसमध्ये पालकांनी लगेचच त्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे जेणेकरून त्यांच्यावर लगेच उपचार सुरु होतील आणि लहान मुलांच्या जवळच्या खेळण्याच्या वस्तू ही जपाव्यात. तर घरात पसरणारे केस ही लहानग्याच्या तोंडात गेल्यावर मुलं आजारी पडू शकतो.” असे वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवानी यांनी सांगितले.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Child Girl swallowed Safety Pin latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: child girl Pin मुलगी सेफ्टी पिन
First Published:
LiveTV