विश्वास पाटलांची चौकशी सीआयडी करणार!

याप्रकरणातील 137 पैकी 33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं आहे, असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितलं.

विश्वास पाटलांची चौकशी सीआयडी करणार!

मुंबई: माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावरील एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी, आता सीआयडी करणार आहे. याप्रकरणातील 137 पैकी  33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं आहे, असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितलं.

मात्र महत्त्वाचं म्हणजे विश्वास पाटील प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाली आहे, अशी धक्कादायक माहिती रवींद्र वायकर यांनी दिली.

याबाबत  निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

याप्रकरणाची सीबीआय, सीआयडी किंवा एसीबीकडून चौकशी करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

पानिपतकारांवर चौकशी समितीचा ठपका

विश्वास पाटील यांनी सेवानिवृत्ती आधी SRA म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घालत विकासकांना हव्या तशा मंजुऱ्या दिल्याचा ठपका, चौकशी समितीने ठेवला आहे.

पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने यापूर्वी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता.

त्यानंतर या समितीला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या समितीने आपल्या अहवालात विश्वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्तीआधी घातलेला धुमाकूळ स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.

एसआरए घोटाळ्याचा आरोप
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी असतानाच्या आपल्या कार्यकाळात मालाड येथील एका विकासकाला नियमबाह्य पद्धतीने फायदा करून दिल्याबद्दल विश्वास पाटील आणि इतरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. फायदा करून दिलेल्या विकासकाच्या कंपनीत विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांना संचालकपदी नेमण्यात आलं होतं. त्यामुळे इथं मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या

'पानिपत'कारांवर 'झोपु' घोटाळ्याचा ठपका, चौकशी अहवाल सादर!


विश्वास पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका 

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CID to interrogate vishwas patil SRA scam case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV