मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालं असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

CM Devendra Fadnavis explanation over Prakash Mehtas controversy

मुंबई:  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालं असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

“प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा?. मेहतांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय हेतूने होत आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मात्र तरीही प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करु. चौकशीत काही आढळलं तर मेहतांवर कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

राधेश्याम मोपलवार पदच्युत

एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

मात्र मोपलवारांना केवळ पदावरुन दूर करु नका तर त्यांना निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

इतकंच नाही तर जो न्याय मोपलवारांना लावला आहे, तोच न्याय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लावावा, त्यांनाही चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरुन हटवावं, अशी मागणी विरोधकांनी केली.

मोपलवारांवर सेटलमेंटचे आरोप

मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आलं. मात्र राधेश्याम मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप असल्याची बातमी माझानं दाखवल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.

प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप

मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच विधानसभेतच ही घोषणा केल्याने मेहता यांचा पाय खोलात गेला आहे.

एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम 293 अन्वये
विरोधकांनी गेल्या आठवड्यात चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला होता.

3 केच्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण
विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.

मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला.

संबंधित बातम्या

मोपलवारांना हटवलं, प्रकाश मेहतांनाही हटवा : विखे पाटील 

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश 

एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:CM Devendra Fadnavis explanation over Prakash Mehtas controversy
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर,...

मुंबई : निधीचं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार
तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार

मुंबई : मालेगाव स्फोटाप्रकरणी 9 वर्षानंतर जामीन मंजूर झालेल्या

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’
टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’

कल्याण : टीसींच्या सतर्कतेमुळे पळून जाणारं अल्पवयीन जोडपं

आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला : निरुपम
आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला...

मुंबई : मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री

लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ
लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ

मुंबई : विधी विभागासह अन्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखल

1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!
1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना विशेष टाडा

ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!

मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा

टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने मारहाण
टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने...

ठाणे : तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या नागरिक आणि

ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न
पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न

मुंबई : भारतात अद्यापही लैंगिक संबंधांबाबत उघडपणे बोललं जात नाही.