VIDEO : अमृता फडणवीस यांचा पंजाबी म्युझिक अल्बम रिलीज

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी हिंदी अल्बममध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे.

VIDEO : अमृता फडणवीस यांचा पंजाबी म्युझिक अल्बम रिलीज

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा पहिला पंजाबी म्युझिक अल्बम लॉन्च झाला आहे. स्वत: अमृता फडणवीस यांनी याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

या अल्बममध्ये अमृता फडणवीस पंजाबी/बॉलिवूड मिक्स गाणी गाताना दिसणार आहेत. यू-ट्यूबवर रिलीज झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या पंजाबी अंदाजाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

अमृता फडणवीस यांच्या पंजाबी अल्बमचं नाव 'साड्डी गली/रेल गड्डी' असं आहे. सुमारे चार मिनिटांचा हा अल्बम टी-सीरिजने रिलीज केला आहे. अल्बममध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत पंजाबी गायक दीप मोनी आणि प्रीत हरपाल यांनीही आपला आवाज दिला आहे.

हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करताना फडणवीस यांनी लिहिलं आहे की, 'पाहा आणि ऐका धम्माल गाणं साड्डी गली/रेल गड्डी'दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी हिंदी अल्बममध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे.

पाहा व्हिडीओ

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: CM Devendra Fadnavi’s wife Amruta’s new album in Punjabi launched
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV