सतत अंदाज चुकणाऱ्या हवामान विभागावर मुख्यमंत्री नाराज, थेट केंद्राला पत्र

29 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीनंतर हवामान विभागाने 30 ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

CM Fadnavis upsets on IMD, writes to centre

मुंबई : हवामान विभागाने वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजाचा बळी आता फक्त शेतकरीच नाही, तर सरकारही ठरताना दिसतं आहे. कारण पावसाच्या चुकीच्या अंदाजाबद्दल खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाबद्दल, हवामान बदल आणि भू विज्ञान मंत्रालयाला नाराजीचं पत्र लिहिलं आहे.

29 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीनंतर हवामान विभागाने 30 ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईतली सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवाच यावेळी सुरु होत्या. शिवाय मुसळधार पावसाचा अंदाज घेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 30 ऑगस्टला मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली होती.

मात्र 30 ऑगस्टला पाऊस पडला नाही. दिवसभर चक्क ऊन पडलं होतं. सुट्टी दिल्यामुळे शासकीय कामाचा दिवस वाया गेला. थोडक्यात हवामान विभागाचा 30 ऑगस्टचा मुसळधार पावसाचा अंदाज चुकला होता.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाशी संबंधित केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:CM Fadnavis upsets on IMD, writes to centre
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत
नवजात बालकांना लाखो रुपयांना विकणारी महिला अटकेत

मुंबई : गरीब कुटुंबातील लहान मुलांना अवघ्या काही हजारात विकत घेऊन

शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे

डोंबिवली : शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा

सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना विनंती करणार
सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील सेना आमदार उद्धव ठाकरेंना...

मुंबई : मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका
शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर विखारी टीका

मुंबई: नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक

एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन
एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं

ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला सक्त ताकीद
ही चूक पुन्हा होता कामा नये, मुख्यमंत्र्यांची मुंबई विद्यापीठाला...

मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकालाच्या बाबतीत यंदा कोर्टालाच तारीख

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारला धोका नाही : रामदास आठवले

मुंबई : शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास
55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला

रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरीच्या तरुण-तरुणीची बदलापूरमध्ये रेल्वेखाली आत्महत्या

कल्याण : कल्याणजवळच्या बदलापूरमध्ये एक तरुण आणि तरुणीने

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज ट्रॅकची