मुख्यमंत्री सकल मराठा समाजासोबत चर्चा करणार : चंद्रकांत पाटील

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 10:46 AM
मुख्यमंत्री सकल मराठा समाजासोबत चर्चा करणार : चंद्रकांत पाटील

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाबाबत सकल मराठा समाज राज्य सरकारसोबत चर्चेला तयार असल्याच्या निर्णयाचे राज्य शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. सकल मराठा समाजासोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरात लवकर वेळ घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमकी कुणाशी चर्चा करावी, हा मुद्दा वारंवार उपस्थित होत होता. आता सकल मराठा समाजाने स्वतःहून राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याने समाजाच्या मागण्यांबाबत चर्चेची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

सकल मराठा समाजाच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतले आहेत. सकल मराठाच्या या चर्चेच्या निर्णयामुळे त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यास शासनास मदत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नुकतीच मराठा समाजाची महागोलमेज परिषद कोल्हापूर येथे पार पडली. या परिषदेत घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी राज्य समन्वय समितीचे अभिनंदन केले.

First Published:

Related Stories

तरुणाच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिचा प्रियकर अटकेत
तरुणाच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिचा प्रियकर अटकेत

मुंबई : मुंबईतील वांद्रे भागातल्या खेरवाडीत झालेल्या हत्याकांडाचा

नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची  वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या...

नाशिक : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा

मुंबईतील पाण्याच्या पाईपलाईन शेजारच्या अवैध झोपड्या वर्षभरात हटवणार : बीएमसी
मुंबईतील पाण्याच्या पाईपलाईन शेजारच्या अवैध झोपड्या वर्षभरात...

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनलगतच्या सर्व

'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !
'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !

मुंबई: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तुमच्या लाडक्या

तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई: 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली असून

Flipkart Sale: आयफोन आणि गुगलच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर
Flipkart Sale: आयफोन आणि गुगलच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर

मुंबई: देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक ऑनलाईन शॉपिंग

'एबीपी माझा'ची दशकपूर्ती, प्रेक्षकांच्या विश्वासपूर्तीचा 'माझा'ला अभिमान!
'एबीपी माझा'ची दशकपूर्ती, प्रेक्षकांच्या विश्वासपूर्तीचा 'माझा'ला...

मुंबई: दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तुमच्या सर्वांच्याच साक्षीनं

लोकलमधील स्टंटबाजामुळे 'माझा'च्या प्रतिनिधीना दुखापत
लोकलमधील स्टंटबाजामुळे 'माझा'च्या प्रतिनिधीना दुखापत

मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे अनेकदा

ठाणे स्थानकावर महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतीण सुखरुप
ठाणे स्थानकावर महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतीण सुखरुप

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर एका गर्भवतीने बाळाला जन्म दिला.

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे