नोकरदार की व्यावसायिक, सर्वाधिक टॅक्स कोण भरतं?

तुम्ही कामाला/नोकरीला जाताना ज्या फेरीवाल्याकडे चहा-नाश्ता करता, त्या फेरीवाल्याचं उत्पन्न किती आणि तो टॅक्स किती भरतो, याबाबतची आकडेवारी -

नोकरदार की व्यावसायिक, सर्वाधिक टॅक्स कोण भरतं?

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज देशाचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये त्यांनी करदात्यांची संख्या वाढल्याचं प्रकर्षाने नमूद केलं.

मात्र त्यांनी आकडेवारीद्वारे नोकरदारांना चुचकारताना, करबुडव्या व्यावसायिकांवर निशाणा साधला. त्यांनी जी आकडेवारी सादर केली, ती चकीत करणारी आहे.

जेटली म्हणाले, “साधरणत: नोकरदारांपेक्षा व्यावसायिकांचं उत्पन्न जास्त असतं अशी सगळ्यांना समज असतो. त्यामुळे आयकर भरण्यातही व्यावसायिकांचीच संख्या जास्त असेल, असा तर्क काढला जातो. मात्र इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार, सर्वाधिक वैयक्तिक कर भरणाऱ्यांमध्ये नोकरदारच अग्रेसर आहेत”.

यासाठी जेटलींनी 2016-17 या असेसमेंट वर्षाची आकडेवारी सादर केली. 2016-17 मध्ये 1 कोटी 89 लाख नोकरदारांनी 1 कोटी 44 लाख कोटी रुपयांचा कर भरला. म्हणजेच सरासरी 76,306 रुपये प्रती नोकरदार असा कर भरण्यात आला.

दुसरीकडे 1 कोटी 88 लाख व्यापारी- व्यावसायिकांनी कर भरला. म्हणजेच कर भरणाऱ्या व्यावसायिकांची संख्या जवळपास नोकरदारांएवढीच आहे. मात्र त्यांनी भरलेला कर हा नोकरदारांच्या तुलनेत खूपच कमी आहे. व्यावसायिकांनी भरलेला कर 48 हजार कोटी रुपये आहे. यांची सरासरी 25,753 रुपये प्रती व्यावसायिक इतकी आहे.

म्हणजेच टॅक्स भरणाऱ्यांमध्ये नोकरदारांचीच संख्या जास्त आहे, व्यावसायिकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरदार नियमित रिटर्न भरतात, पण व्यावसायिक कर चुकवतात किंवा चलाखी करतात, असंच ही आकडेवारी सांगते.

डॉक्टर, इंजिनिअर, वकील हे व्यावसायिकांमध्ये येत असले, तरी टॅक्स भरणाऱ्यांमध्ये त्यांची संख्या कमी असल्याचं सांगण्यात येतं. तसंच रस्त्यावर बसणारे व्यावसायिक ज्यांचं उत्पन्न दिवसा 1 हजारापासून ते 10 हजारांपर्यंत आहे, ते सुद्धा टॅक्स कमी प्रमाणात भरतात किंवा भरतच नाहीत.

त्यामुळे कर भरणाऱ्यांमध्ये नोकरदारांचीच संख्या जास्त आहे.

संबंधित बातम्या

Budget 2018: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार! 

अर्थसंकल्प 2018 : पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, काय-काय महागलं? 

अर्थसंकल्प 2018 : सर्व रेल्वेत सीसीटीव्ही आणि वायफाय मिळणार 

अर्थसंकल्प 2018 : जेटलींनी देशातील शेतकऱ्यांना काय दिलं? 

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: comparison between individual salaried taxpayer & individual business taxpayer
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV