भोईवाडा कोर्टात जजसमोर आरोपींवर चाकूहल्ला

न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला.

भोईवाडा कोर्टात जजसमोर आरोपींवर चाकूहल्ला

मुंबई : मुंबईतील भोईवाडा कोर्टात तक्रारदाराने आरोपींवर चाकू हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला.

मारहाणीच्या प्रकरणात तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. ज्यावेळी आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यावेळी तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने तीनपैकी दोन आरोपींवर हल्ला केला.

या घटनेत दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Complainent attacked on accused in court latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV