मोदींवर टीका करणाऱ्या प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार

अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात लखनऊ कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोदींवर टीका करणाऱ्या प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीपण्णी करणं दाक्षिणात्य अभिनेत प्रकाश राज यांना महागात पडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात लखनऊ कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणाची सुनावणी 7 ऑक्टोबरला होणार आहे.

मोदी माझ्यापेक्षाही मोठे अभिनेते : प्रकाश राज

‘मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत’ अशा शब्दात सिंघम फेम अभिनेते जयकांत शिकरे म्हणजेच प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. बंगळुरुमधल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रकाश राज यांनी ही टीका केली.

‘मोदी अभिनय करत नाही असं त्यांना वाटत असेल. मात्र, अभिनय काय आणि सत्य काय हे मी चांगलं ओळखतो.’ अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

कोण आहेत प्रकाश राज?

प्रकाश राज हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अशी त्यांची ओळख आहे. प्रकाश राज यांनी सलमान खानसोबत वाँटेड आणि दबंग-2, अजय देवगणसोबत सिंघम , संजय दत्तसोबत पोलिसगिरी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत खाकी यासारखे अनेक बड्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

https://twitter.com/prakashraaj/status/914842966157434880

गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

बंगळूरमधल्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बंगळुरूतल्या राजराजेश्वरी नगर परिसरात मंगळवार 5 सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता.

55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तीन आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.

संबंधित बातम्या

मोदी माझ्यापेक्षाही मोठे अभिनेते : प्रकाश राज


सिंघमचा व्हिलन दिलदार, प्रकाश राज यांच्याकडून गाव दत्तक


सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV