काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह एसीबीच्या केसमधून मुक्त

त्यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आलं आहे.

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह एसीबीच्या केसमधून मुक्त

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एसीबीच्या केसमधून मुक्त करण्यात आलं आहे.

कोणत्याही लोकनेत्या विरोधात खटला चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात ती घेण्यात आली नसल्याने कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात खटला चालवताच येणार नसल्याचं त्यांच्यावतीने एसीबी कोर्टात सांगण्यात आलं.

आरोपपत्रानुसार कृपाशंकर यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांना त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत दाखल झालेल्या खटल्यातून दिलासा मिळाला आहे.

आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपात एसीबीने कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress leader Kripashankar Singh discharged in assets case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV