राणेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची युती?

राणेंविरोधात एकच उमेदवार देऊन त्याला इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे.

राणेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची युती?

मुंबई : नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा वारु रोखण्यासाठी काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाऊन बाहेर पडल्यानंतर राणे भाजपच्या उंबरठ्यावरुन मागे फिरले. त्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यावर ते एनडीएमध्ये सहभागी झाले. यानंतर राणे यांची भाजप मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चाही सुरु झाली.

राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक


मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चित्र स्पष्ट होत नसताना नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. मात्र यात राणेंना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राणेंविरोधात एकच उमेदवार देऊन त्याला इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे.

विधानपरिषद पोटनिवडणुकीत राणेंच्या मदतीला अदृश्य हात?


भाजपने अपक्षांना सोबत घेऊन राणेंना पाठिंबा दिल्यास त्यांना 142 मतं मिळतील. मात्र विरोधकांनी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेनेने मोट बांधली, तर त्यांचं संख्याबळ 146 वर जाईल. तसं झाल्यास विरोधकांचा उमेदवार विधानपरिषदेच्या आमदारपदी येईल.

विधानपरिषद पोटनिवडणुकीत संख्याबळ

भाजप 122

अपक्ष 20

एकूण 142

विरोधक

काँग्रेस- 42

राष्ट्रवादी 41

शिवसेना 63

एकूण 146

मतदान कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनाची अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर 2017
अर्जांची छाननी – 28 नोव्हेंबर 2017
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – 30 नोव्हेंबर 2017
मतदान – 7 डिसेंबर 2017 – सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी – 7 डिसेंबर 2017 – संध्याकाळी 5 वाजता

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress-NCP-Shivsena might make alliance to beat Narayan Rane in Vidhan Parishad Bye poll latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV