संदीप देशपांडेंसह 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक करण्यात आली आहे.

संदीप देशपांडेंसह 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्यांना 18 तारखेपर्यंत कोठडीतच तुरुंगातच राहावं लागणार आहे. मुंबईतील किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

या सगळ्यांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या आठही जणांची आज भायखळ्याच्या आर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे.

काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक करण्यात आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेसह आठ जणांना पोलिस कोठडी

मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी (1 डिसेंबर) सकाळी नासधूस करण्यात आली. आझाद मैदानाजवळ काँग्रेसचं कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा फोडल्या. मुंबई काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं, अशा आशयाचं ट्वीट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं.

परप्रांतीय भटका कुत्रा, निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं होर्डिंग

यानंतर हल्ल्याची जबाबादारी स्वीकारल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक केली. या सगळ्यांवर दंगल, ट्रेसपासिंग, नुकसान आणि नासधूस या कलमांअंतर्गत अटक करण्यात आली.

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे

संजय निरुपम यांचा संताप
मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली.  पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

संजय निरुपम म्हणाले, "मी मनसेचा हताशपणा समजू शकतो. त्यांचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून मार खात आहेत. मनसेचा आमच्या कार्यालयावरील हल्ला हा भ्याड आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्हीही प्रत्युत्तर देऊ."

संबंधित बातम्या

काँग्रेस कार्यालय तोडफोड: संदीप देशपांडेंना अटक

मनसेच्या भित्र्या, नपुंसक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम

होय, मुंबई काँग्रेसचं कार्यालय मनसेने फोडलं: संदीप देशपांडे 

मनसेच्या भित्र्या, नपुसंक, भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला: संजय निरुपम

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Congress office vandalise case : 14 days judicial custody to 8 MNS leader including Sandeep Deshpande
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV