सीएसएमटी ते दादर लोकल सेवा बंद, मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

दादरपासूनच पुढे कल्याण, कर्जत, कसारासाठी लोकल चालवण्यात येतील.

सीएसएमटी ते दादर लोकल सेवा बंद, मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मुंबई : परळ आणि करी रोड येथील लष्कराकडून उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचं काम आज केलं जाणार आहे. या कामांसाठी सीएसएमटी ते दादरपर्यंत अप जलद मार्गावर सकाळी 8.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत, तर डाऊन जलद आणि अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल.

या काळात सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल फेऱ्या होणार नाहीत. तर दादरपासूनच पुढे कल्याण, कर्जत, कसारासाठी लोकल चालवण्यात येतील.

हा ब्लॉक सुरू होण्यापूर्वी दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची जलद लोकल सकाळी 8.12 वाजता येईल. दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी शेवटची धिमी लोकल सकाळी 9.00 वाजता येईल.

सीएसएमटीहून शेवटची धिमी लोकल सकाळी 9.05 वाजता सुटेल. सीएसएमटीहून शेवटची जलद लोकल सकाळी 9.12 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी पहिली धिमी लोकल दुपारी 3.35 वाजता येईल.

दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी पहिली जलद लोकल दुपारी 4.38 वाजता येईल. सीएसएमटीहून पहिली जलद लोकल दुपारी 3.40 वाजता सुटेल.

सीएसएमटीहून पहिली धिमी लोकल दुपारी 3.50 वाजता सुटेल. ब्लॉक काळात अपच्या दिशेने येणाऱ्या लोकल दादर, कुर्लापर्यंतच चालवण्यात येतील आणि याच स्थानकातून काही लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. तर याचा फटका एक्स्प्रेस गाड्यंनाही बसणार आहे. आज अनेक एक्स्प्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: csmt to dadar local ser
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV