ठाण्यात 16 दहीहंडी पथकांवर गुन्हा दाखल

By: | Last Updated: > Friday, 26 August 2016 7:29 AM
Dahihandi celebration in Mumbai

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 20 फुटांच्या मर्यादेचं उल्लंघन करत मुंबई-ठाण्यात मनसे आणि गोविंदा पथकांनी थरांचा थरार अनुभवला. त्यामुळे एकट्या ठाण्यात नियम तोडणाऱ्या 16 गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

ठाण्यात आज सकाळी मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जयजवान पथकाने 9 थर लावले. त्यामुळे पोलिसांनी दहीहंडी आयोजक अविनाश जाधव आणि जयजवान पथकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर चेंबूरमध्ये मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांच्या दहीहंडीतही नियमांची मोडतोड करण्यात आली. नौपाड्यात 40 फुटांवर नियमभंग हंडी उभारुन मनसेने निषेध केला.

 

मुंबई – ठाण्यातील दहीहंडी देशभरात प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर यांची , घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम, ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती,  शिवसेना आमदार रवींद्र फाटक – संकल्प दहीहंडी,  टेंभीनाका – एकनाथ शिंदे, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट – खासदार राजन विचारे या दहीहंडी प्रसिद्ध आहेत.

 

9.00 PM : मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 126 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 92 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला असून 34 जणांवर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मागील वर्षी रात्री दहा वाजेपर्यंत 218 गोविंदा जखमी झाले होते.

 

8.00 PM : ठाण्यात 16 गोविंदा पथक आणि मनसे आयोजकांवर गुन्हा दाखल, भारतीय दंडविधान कलम 308, 336, 188, 34 आणि बॉम्बे पोलिस अॅक्ट 140 अंतर्गत गुन्हा

 

7.00 PM : मुंबईत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 71 गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी 54 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं. तर 17 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

सायन रुग्णालयात 5, नायर रुग्णालयात 4, नानावटी रुग्णालयात 1, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये 6 आणि भाभा रुग्णालयात 3 गोविंदावर उपचार सुरु आहेत.

 

4.00 PM सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाच उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांवर कठोर कारवाई करू नये अशी मागणी, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केली आहे । या गोविंदा पथकांकडून न्यायालयाचा अवमान झाला असला तरी त्यांनी कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे कठोर कारवाई करू नये अशी विचारे याची मागणी आहे.

 

3.15 PM जय जवान गोविंदा पथकावर गुन्हा दाखल, ठाणे पोलिसांची कारवाई

 

PHOTO: नौपाड्यात ‘जय जवान’ची 9 थरांची सलामी

 

2.35 PM जय जवान गोविंदा पथकाचा हंडी फोडण्यासाठी ९ थराचा प्रयत्न,  पहिल्याच प्रयत्नात जय जवानने नौपाड्यात 9 थर लावले. नियमांचं उल्लंघन

 

2.30 PM मुंबईतील विविध हॉस्पिटलमध्ये 13 जखमी गोविंदांना दाखल करण्यात आलं होतं. त्यातील चौघांना रुग्णालयात दाखल केलं, असून 9 जणांवर उपचार करुन सोडण्यात आलं आहे.

 

PHOTO…यांनी थेट शिडी लावूनच हंडी फोडली!

 

2.15 PM चेंबूर नाक्यावरच्या दही हंडीत मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत बालवीर पथकाने 8 थर रचून 20 फुटांची मर्यादा ओलांडली. 18 वर्षा खालील चिमुकल्याने 8 व्या थरावरून सलामी दिली. कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन. मंडळ – पथकांवर कारवाई झाल्यास, मनसे त्यांच्या पाठीशी उभी राहणार, नितीन सारदेसाईंच्या ग्वाही.

 

PHOTO: गोविंदांचा शेवटच्या थरावर चढून निषेध!

1.15 PM – बोरिवली शिवसेनेकडून दहीहंडीत सर्व नियम पायदळी, मागाठाणे दहीहंडीत शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीत सुरक्षिततेची काहीही व्यवस्था नाही, उंचीची मर्यादा पाळत नाहीत

 

1240. PM ठाण्यात मनसेच्या दहीहंडीच्या  6 पथकांनी 7 थर लावले

Japnis in Dahihandi

12.20 PM – ठाण्यात जतन गोविंदा पथकाकडून तोंडात मोजपट्टी धरुन दहीहंडी

12.15 PM – चेंबूर येथील मनसेच्या दहीहंडीमध्ये 8 थर लावत कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन….दहीहंडी 20 फुटांवर, मात्र तरीही सलामी 8 थरांची…मनसेचे पदाधिकारी कर्ण दूनबळे यांची दहीहंडी

 

PHOTO: जातीधर्मापलीकडील जन्माष्टमी

 

12.03 PM दादरला महिला गोविंदांची अनोखी ‘चक्रीहंडी. हंडी फोडण्यासाठी चार फिरत्या थरांची थरारक कसरत. छोट्या बालगोविंदाने फिरत्या चक्रीथरांवर चढून फोडली हंडी.

12.01 PM जय गोविंदा पथकाची पारंपारिक साखळी लोकनृत्याची हंडी. पुरुषांसोबतच महिलागोविंदा, बालगोविंदांचाही पारंपारिक नृत्यात सहभाग. गोविंदांच्या अनोख्या, पारंपारिक  वेषभूषांचंही आकर्षण…
खालुबाजा, सनई सारख्या पारंपारिक वाद्यांच्या साथीनं पारंपारिक दहिहंडी उत्सव साजरा.

 

PHOTO…अन् त्यांनी झोपून 9 थर रचले!

 

11.55 AM : #ठाणे – मनसेकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन, सात थर रचून 35 फुटांचा मनोरा
https://www.youtube.com/watch?v=vbkMpoVjxeE

11.45 AM – भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारांची हंडी फोडली

 

11.30 AM : विवेकानंद यूथ कनेक्ट गोविंदा पथकाची, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर चार थरांची सलामी. बॉलिवूडमधील त्यांच्या योगदानाबद्दल आदर म्हणून दरवर्षी हे पथक इथं सलामी देतं.

 

11.15 AM : दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जपानचे पाहुणे थेट मुंबईत दाखल. गोविंदांसोबत सेल्फी. रक्षाबंधनही साजरा. सणांमध्ये इतक्या रंगांची उधळण कुठेच होत नसल्याचं जॅपनिज पाहुण्यांची कबुली.

11AM : चेंबूर गावात छोट्या वाडीतल्या गोविंदांनी बाळ्या डान्स आणि दही काल्याची गाणी गात पारंपरिक पद्धतीने नेट नेटका गोविंदा केला साजरा. ज्येष्ठांपासून बालगोविंदांनी ही धरला ठेका.

 

10.40 AM – गोरेगांवच्या गांवदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी. उंचीची मर्यादा आणि वयाची मर्यादा दोन्ही मर्यादांचा भंग.

10.35 AM – जय हनुमान मंडळाचे जमीनीवर झोपून 9 थर

दादरमध्ये जय हनुमान या जुन्या दहीहंडी पथकाने, न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून 9 थर रचले.

dadar sleeping handi8

नौपाड्यात मनसेची 40 फुटांवर हंडी

सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाल न जुमानता मनसेनं ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल ४० फुटांवर हंडी बांधली आहे. कायदाभंग असं या हंडीला नाव देण्यात आलं असून 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसे ही हंडी फोडणार की त्याआधी पोलीस त्यावर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

 

चेंबूरमध्ये प्रशासनाकडून मार्किंग

तिकडे चेंबूरमध्ये मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र 20 फुटांची मर्यादा पाळायला मनसेने नकार दिल्यामुळे प्रशासनाने या ठीकाणी 20 फूटापर्यंत मार्किंग करुन ठेवलं आहे. मनसेच्या दहीहंडीची उंची मोजण्यासाठी पोलिसांनी हे मार्किंग गेल्याचं समजतंय. त्यामुळे यादरम्यान मनसे नियमांचं उल्लंघन करतंय की नाही याकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे.

 

डोंबिवलीतही नियमाचं उल्लंघन

सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने  5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त सलामी दिली.

 

दरम्यान या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला आदर असला तरीही आमचं स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ नये असं या मंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळे नवसाई पथकातले गोविंदा आज सात थर लावणार आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.

 

साईदत्तची 20 फुटांची हंडी

काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलंय. दादर परिसरातल्या साईदत्त मंडळाने नियमांप्रमाणे दहीहंडी साजरा करत 20 फुटांच्या आतच हंडी बांधली आहे.

 

काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता. अशा आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिलेत. त्यामुळे पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे.

black patti dahihandi

डोळ्यावर पट्टी बांधून हंडीला सलामी

दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतायत. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Dahihandi celebration in Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा आवळला!
लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा...

जळगाव : लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा

आता सोलापूरमध्येही पासपोर्ट सेवा केंद्र
आता सोलापूरमध्येही पासपोर्ट सेवा केंद्र

सोलापूर : सोलापूरमध्ये रविवारी 30 जुलै रोजी पासपोर्ट कार्यालयाचं

पीक विमा भरण्यासाठी विलंब, संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक
पीक विमा भरण्यासाठी विलंब, संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक

परभणी : पीक विमा भरण्यासाठी लागत असलेल्या वेळेमुळे संतप्त

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/07/2017

शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम देऊ,

गोव्यात पोटनिवडणूक, पणजीतून पर्रिकर, तर वाळपईतून राणे मैदानात
गोव्यात पोटनिवडणूक, पणजीतून पर्रिकर, तर वाळपईतून राणे मैदानात

पणजी (गोवा) : संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या

अमरावती विद्यापीठातील कर्मचारी पॉर्न पाहण्यात मग्न
अमरावती विद्यापीठातील कर्मचारी पॉर्न पाहण्यात मग्न

अमरावती : अमरावती विद्यापीठातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत काम

दप्तर घ्या आणि कोंबड्या-बकऱ्या द्या, पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा
दप्तर घ्या आणि कोंबड्या-बकऱ्या द्या, पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा...

पालघर : पालघर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या 129 शाळा

राज्यातही 'वंदे मातरम्'सक्ती, राज पुरोहित मागणी करणार
राज्यातही 'वंदे मातरम्'सक्ती, राज पुरोहित मागणी करणार

मुंबई : मद्रास हायकोर्टाचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातही आता ‘वंदे

फरार आरोपीचा पोलिसांवर तलवारीने हल्ला
फरार आरोपीचा पोलिसांवर तलवारीने हल्ला

नांदेड : नांदेडमध्ये एका फरार आरोपीनं थेट पोलिसांवरच तलवारीने

मांढरदेवी गडावर कुटुंबप्रमुखानेच सहा जणांना विष पाजलं
मांढरदेवी गडावर कुटुंबप्रमुखानेच सहा जणांना विष पाजलं

सातारा : साताऱ्यातील मांढरदेवी गडावर अख्ख्या कुटुंबाने विषप्राशन