डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 21 March 2017 7:44 AM
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी

मुंबई : डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत. हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या रांगा मोठ्या लागल्या आहेत.

दुसरीकडे डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवासी डॉक्टरांचा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांनी कोर्टाचा अवमान केला, असा दावा याचिकेत केला आहे.

दरम्यान निवासी डॉक्टर नियमांनुसार कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

DOCTOR PROTEST sion hospital
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.

आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.

मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?

Doctor_Protest

– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा

– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी

– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा

– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा.

औरंगाबादमध्येही डॉक्टरला मारहाण

aur docter aandolan
तिकडे औरंगाबादेतील घाटी या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मारहाणप्रकरणी निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली. रात्री उशिरा एका रुग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. या निषेधार्थ रुग्णालयातील रुग्ण सेवा बंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल

सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

First Published: Tuesday, 21 March 2017 7:44 AM

Related Stories

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर
मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर

मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासप्रवर्ग आयोगाकडे पाठवायचा की

नागपूरमधील शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचं पलायन
नागपूरमधील शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचं पलायन

नागपूर: नागपूरच्या बालसुधार गृहातून तब्बल 14 मुले पळून गेल्याची

उष्माघाताचा बीडमध्ये पहिला बळी
उष्माघाताचा बीडमध्ये पहिला बळी

बीड : राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. बीडमध्ये या

एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल
एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल

चंद्रपूर : संघर्षयात्रेत बडेजाव टाळा असे आदेश विरोधी पक्षांनी दिले

रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान
रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान

रायगड : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच

विरोधी पक्षाच्या संघर्षयात्रेला सुरुवात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एल्गार
विरोधी पक्षाच्या संघर्षयात्रेला सुरुवात, शेतकऱ्यांच्या...

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या

'नीट'साठी मराठवाड्यात आणखी एक परीक्षा केंद्र!
'नीट'साठी मराठवाड्यात आणखी एक परीक्षा केंद्र!

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने नीट म्हणजेच वैद्यकीय प्रवेश पात्रता

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय सोलर कार स्पर्धा, आफ्रिकन देशही सहभागी
पंढरपुरात आंतरराष्ट्रीय सोलर कार स्पर्धा, आफ्रिकन देशही सहभागी

पंढरपूर : सिंहगड संस्थेनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर कार

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/03/2017

*एबीपी माझाच्या प्रेक्षक/वाचकांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या

सातशे वर्षांचा वारसा, नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याला नवी झळाळी
सातशे वर्षांचा वारसा, नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याला नवी झळाळी

700 वर्षांपासून अभिमानास्पद इतिहासाचा वैभवशाली वारसा आपल्या