मुंबईत बांधकाम विकासकाची गळफास घेऊन आत्महत्या

जयेश यांनी शुक्रवारी सकाळी रुनवाल एन्क्लेव्ह या इमारतीतील घराची चावी मुलाकडून घेतली आणि तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबईत बांधकाम विकासकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मुलुंडमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि विकासकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जयेश पटेल असं आत्महत्या केलेल्या विकासकाचं नाव आहे. गोवर्धननगरमध्ये राहणारे जयेश पटेल शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख होते.

जयेश यांनी शुक्रवारी सकाळी रुनवाल एन्क्लेव्ह या इमारतीतील घराची चावी मुलाकडून घेतली आणि तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी जयेश दुपारी दीड वाजता एका मित्राला भेटले, मात्र त्यानंतर 4 वाजेपर्यंत जयेश यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी घर गाठलं. दुसऱ्या चावीने घर उघडलं असता तिथे त्यांना जयेश यांनी गळफास घेतल्याचं दिसलं.

नातेवाईकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. मागील काही दिवसांपासून जयेश व्यवसायात चिंताग्रस्त होते. यामुळे कदाचित त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV