अखेर मुख्यमंत्र्यांचा विरोध मावळला, बुलेट ट्रेनला बीकेसीतील जागा देणार

बीकेसीतील अडीच एकर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेलं बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis government ready to give BKCs land for indians first bullet train

प्रातिनिधीक फोटो

मुंबई: राज्य सरकारने विरोध दर्शवूनही, केंद्र सरकार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अडीच एकर जमीन बुलेट ट्रेनसाठी देण्यास, फडणवीस सरकार तयार झालं आहे.

बीकेसीतील अडीच एकर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेलं बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बीकेसीतील जमीन बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी देण्यास राज्य सरकारचा विरोध होता. मात्र  राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली अखेर निर्णय बदलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उद्या मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमीपूजन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना आमंत्रित केलं आहे. जपानच्या मदतीनेच भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे.

या भूमीपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

राज्य सरकारचा विरोध का होता?

बुलेट ट्रेन टर्मिनल बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) व्हावं अशी रेल्वेची इच्छा आहे. मात्र राज्य सरकारने त्याऐवजी बांद्रा रिक्लेमेशनची जागा देण्याचा पर्याय दिला आहे. कारण एमएमआरडीएने बीकेसीत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र उभारण्याचं यापूर्वीच नियोजन केलेलं आहे.

यावादामुळे राज्यातील बुलेट ट्रेनचा प्रकल्प तीन वर्षानंतरही रखडल्याचं चित्र आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रकल्पाबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली होती. बैठकीत राज्य सरकारने हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजे बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत बीकेसीमधील त्यांना हव्या असलेल्या जागेला विरोध केला होता.

रेल्वे विभागाला बुलेट ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनसाठी बीकेसीमधील भूमिगत स्टेशनसाठी जागा हवी आहे. मात्र याच जागेवर राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (financial hub) बांधायचे आहे. बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्टेशनमूळे आर्थिक केंद्र उभारण्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या जागेबाबत नकार देत धारावीतल्या जागेचा प्रस्ताव समोर ठेवला होता. पण आता राज्य सरकारने ही जागा देण्यास मंजुरी दिली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प कधी पूर्ण होणार?

भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावायला लागणार? या लाखमोलाच्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. 2023 हे बुलेट ट्रेन प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करु असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
  • मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स
  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात
  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.

संबंधित बातम्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिल्याच स्टेशनवर रखडली

भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांचं उत्तर

मुंबई-नाशिक बुलेट ट्रेन, मुख्यमंत्र्यांचा केंद्राकडे प्रस्ताव

भारतात लवकरच बुलेट ट्रेन धावणार, जपानसोबत करार

आता नाशिककरांचा वायू वेगाने प्रवास, देशातील पहिली बुलेट ट्रेन नाशिकमधून धावणार !

मुख्यमंत्री पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर, गुंतवणूक-पर्यटन विकासाचे प्रयत्न

बुलेट ट्रेन महागात पडण्याची शक्यता, खर्च 60 हजार कोटींवरुन 1 लाख कोटींवर

भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं तिकीट जगात सर्वात स्वस्त

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:devendra fadnavis government ready to give BKCs land for indians first bullet train
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय नाही, आमदारांना उद्धव ठाकरेंचं...

मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण आलं आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुखांवर राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात ऐतिहासिक दिरंगाई

मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात...

मुंबई : भायखळा कारागृहातील कैद्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा

2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन
2008 मालेगाव स्फोट : मेजर रमेश उपाध्यायला जामीन

मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या

घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार
घाटकोपर दुर्घटना : शितपच्या जामिनावर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपनं

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?
राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?

मुंबई : नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत भाजप आणि

वाहतूक पोलिसावर हात उचलणारा सोहेल मेमन ड्रग्स रॅकेटमध्ये गजाआड
वाहतूक पोलिसावर हात उचलणारा सोहेल मेमन ड्रग्स रॅकेटमध्ये गजाआड

वसई : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या नालासोपारा युनिटने अंमली

राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा
राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेनेच्या अरविंद भोसलेंवर गुन्हा

मुंबई : नारायण राणे यांच्या विरोधात केलेली पोस्टरबाजी शिवसेनेच्या

‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल
‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल

पालघर : मित्रांची संगत, किंमती मोबाईल, फिरण्याची हौस या साऱ्यांमुळे