LIVE: सरकारकडून नरेंद्र पाटील यांना लेखी आश्वासन

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

LIVE: सरकारकडून नरेंद्र पाटील यांना लेखी आश्वासन

मुंबई: मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी रविवारी रात्री जे जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयात 84 वर्षाच्या धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

LIVE UPDATE

राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे. जमिनीचं फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असं सरकारच्यावतीने म्हटलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचं पत्र धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांना दिलं.

जोवर योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.

Govt letter to Dharma Patils son

*****

धर्मा पाटील यांच्या मुलानं हॉस्पिटलच्या आवारातच आंदोलन सुरु केलंय आणि त्याची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वीच मंत्री जयकुमार रावल आणि गिरीश महाजन जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

धुळ्यात शेतकरी एकवटले

सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शेतकरी एकवटले आहेत.

धर्मा पाटलांच्या गावातील शेतकऱ्यांना रास्ता रोको करुन सरकारचा निषेध सुरु केला. तर इकडं मुंबईत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी जे जे रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केलं.

जोवर योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं.

काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयात 84 वर्षाच्या धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

या घटनेनं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

धर्मा पाटील धुळयापासून 48 किलोमीटरवर असलेल्या विखरण देवाचे या गावचे रहिवाशी आहेत. त्यांची तिथं 5 एकर शेती आहे. 2010-11 मध्ये ही शेती औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. त्या जागेवर 600 आंब्याची झाडं होती. मात्र त्या फळबागेची दखल न घेता सरकारनं त्यांना कोरडवाहू शेतकरी म्हणून सरसकट केवळ 4 लाख 3 हजार रुपयाचा मोबदला दिला.

राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

84 वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यूने अत्यंत दु:ख जालं. धर्मा पाटील यांनी असंवेदनशील आणि  उदासिन सरकारविरोधात लढा दिला. कर्जमाफीची धूळफेक, शेतमालाला भाव नाही, जमिनी संपादनाची क्रूर प्रक्रिया आणि तुटपुंजी भरपाई या सर्वाने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. या संपूर्ण प्रकरणाची न्यायलयीन चौकशी व्हावी- पृथ्वीराज चव्हाणअजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस 

दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

धनंजय मुंडे

धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा

अशोक चव्हाण

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या आहे. सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे.
सुनील तटकरे

सरकारने अन्याय केला तरी ते शेवटपर्यंत आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी झगडत राहिले. धर्मा पाटील यांचे दुःखद निधन होणे या सरकारसाठी लाजिरवाणे आहे. आता कुणावर ३०२ दाखल करायचा? धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सुप्रिया सुळे

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ! या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री यांना लाज वाटली पाहिजे.राधाकृष्ण विखे पाटील

धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुर्दैवी... त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली... हा सरकारी अनास्थेचा बळी आहे... या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे हजारो शेतकर्‍यांनी प्राण गमावल्यानंतरही सरकारला जाग येत नाही, हे संतापजनक...

काय आहे संपूर्ण प्रकरण?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.

संबंधित बातम्या

धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील

अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dharma Patil, Age Old farmer from Vikharan (Dhule) who attempted suicide at Mantralaya, Mumbai, on 22nd Jan, died
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV