मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द

 

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सकाळच्या सत्रातली अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तसेच मुंबई विमानतळावरील मुख्य रनवे देखील अद्याप बंदच आहे.

दरम्यान, मुख्य रनवेवर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यानं सध्या काही विमानांची उड्डाणं ही पर्यायी रनवेवरुन सुरु आहे.

वाराणसी-मुंबई विमान लँडिंगच्या वेळी चिखलात रुतलं
दुसरीकडे काल (मंगळवार) रात्री वाराणसीहून मुंबईला येणारं विमान लँडिगच्या वेळी चिखलात रुतलं. वाराणसीहून मुंबईला रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे 27 वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं.

फोटो सौजन्य : ANI फोटो सौजन्य : ANI

वाराणसीहून मुंबईला आलेल्या स्पाईसजेटच्या विमानाला हा अपघात झाला. रनवे 27 वरुन विमान पुढे गेल्यानं विमानाची चाकं चिखलात रुतली आहेत. या विमानातील 183 प्रवासी आणि क्रु मेंबर सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, विमान चिखलात रुतलं असून त्यातील प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. तसंच विमानात कुढलीही आग किंवा धूर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचं विमान लँडिंगवेळी चिखलात रुतलं

मुंबईत पावसाचा जोर कायम, राज्यभरातही संततधार


मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV