आईला अपशब्द वापरल्याने डोंबिवलीत शिक्षिकेची हत्या

आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहित तायडेने हत्या केल्याचं तपासात उघड झालं.

आईला अपशब्द वापरल्याने डोंबिवलीत शिक्षिकेची हत्या

डोंबिवली : डोंबिवलीत 65 वर्षीय ट्यूशन टीचरच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. आईला उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे रोहित नावाच्या विद्यार्थ्याने मनिषा खानोलकर यांची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

डोंबिवलीतील कोपरगावात असलेल्या ओम परशुराम अपार्टमेंटमध्ये मनिषा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. विष्णूनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन रोहित तायडे या तरुणाला अटक केली.

आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहितने हत्या केल्याचं तपासात उघड झालं. रोहितने ट्यूशन टीचरच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात कुकरने वार करुन त्यांची हत्या केली.

मनिषा खानोलकर गेल्या 17 ते 18 वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्या शालेय विद्यार्थ्यांचे ट्यूशन्स घायच्या. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास ट्यूशनसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला, मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुलांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता त्यांना मनिषा निपचित पडलेल्या दिसल्या.

ही बाब विद्यार्थ्यांनी सोसायटीच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ दरवाजा तोडला. तेव्हा मनिषा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या पडला होता. मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला कुकर होता.

काही दिवसांपूर्वी मनिषा यांचं एका महिलेसोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिचा मुलगा रोहित तायडे याला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

आपल्या आईसोबत मनिषा यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यांनी आपल्या आईला शिव्या दिल्याचा राग मनात होता. या रागातून त्याने खानोलकर यांचं घर गाठून डोक्यात कुकर घालत हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Dombivali : Student allegedly killed tuition teacher for abusing mother latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV