कडोंमपाच्या भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

जून ते ऑगस्ट 2017 या कालावधीत दया गायकवाड यांनी फेसबुकवरुन आपल्याशी ओळख केली. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर दया विवाहित असल्याचं समजल्यानंतर, त्याने धमक्या देणं सुरु केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

कडोंमपाच्या भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपा नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती दया गायकवाड यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील एका तरुणीने हा आरोप केला असून, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जून ते ऑगस्ट 2017 या कालावधीत दया गायकवाड यांनी फेसबुकवरुन आपल्याशी ओळख केली. लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर दया विवाहित असल्याचं समजल्यानंतर, त्याने धमक्या देणं सुरु केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

शिवाय याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अश्विनी धुमाळ आणि त्यांचे पती मनोज धुमाळ यांनी घरी बोलावून दयाकडे पैसे आणि घर मागण्यास सांगितलं आणि त्याचं रेकॉर्डिंग करुन खंडणीची खोटी केस टाकण्याची धमकी दिली. याचा गैरफायदा घेत दयाने पुन्हा आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली होती.

त्यानुसार ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये दया गायकवाड यांच्यासह अश्विनी आणि मनोज धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यानंतर या तिन्ही आरोपींनी फोन बंद केले असून ते फरार झाल्याचं सांगितलं जातं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV