बांधकाम व्यवसायिक डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!

हे पैसे भरण्यास वाढीव मुदत देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.

बांधकाम व्यवसायिक डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे थकवलेले 50 कोटी रुपये आजपर्यंत कोर्टात जमा करायचे होते, जे त्यांनी केलेले नाहीत. हे पैसे भरण्यास वाढीव मुदत देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.

डीएस कुलकर्णींना हायकोर्टाकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पुढील 15 दिवसांत म्हणजेच 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये जमा करण्याची तयारी डीएसकेंनी दाखवली होती. मात्र या तारखेनंतर ही रक्कम भरण्यास विलंब झाला तर कुठल्याही क्षणी डीएस कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

... तर डीएस कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक?


हायकोर्टात आज डीएसकेंना पत्रद्वारे यासंदर्भात माहिती द्यायची होती. मात्र सरकारी वकिलांनी 15 दिवसांच्या कालावधीवर आक्षेप घेतला. 15 दिवस ही खूप मोठी मुदत असल्याचा आरोप वकिलांनी केला.

गुंतवणूकदारांची थकित बाकी या पैशांमधून चुकती केली जाणार आहे. नफ्यातील 25 टक्के रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. तसंच विकता येणाऱ्या संपत्तींची यादीही हायकोर्टाने डीएसकेंना सादर करण्याचे आदेश दिले होते.

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

कोर्टाने डी एस कुलकर्णी यांना फटकारत केवळ एक तासाची मुदत दिली होती. बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंने दिले होते. त्यानंतर सोमवारपर्यंत 50 कोटी नेमके कधी भरणार याविषयी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणं डीएसकेंना अनिवार्य करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: DS Kulkarni can arrested any time high court denied to more time
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV