डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये भरण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पुन्हा अपयशी ठरले आहेत. त्यामुळे डीएसकेंकडून कोर्टात 12 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत.

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

मुंबई : गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये भरण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पुन्हा अपयशी ठरले आहेत. त्यामुळे डीएसकेंकडून कोर्टात 12 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. ही संपत्ती राज्य सरकारनं ताब्यात घेऊन, गरजू पीडितांना आधी त्यांची रक्कम देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

सध्या मुंबई उच्च न्यायालयात डीएसकेंच्या जामीन अर्जावकर सुनावणी सुरु आहे. यापूर्वीच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने डीएसकेंनी आपल्या पत्नीसोबत हायकोर्टात हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आजच्या सुनावणीसाठी डीएसकेंच्या पत्नी हेमांगी या देखील हायकोर्टात उपस्थित आहेत.

त्यामुळे आज हायकोर्टात डीएसके कोर्टाला काय सांगतात. आणि त्यानंतर कोर्ट त्यांना पुन्हा जामीन देणार की नाही, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, गुंतवणुकदारांचे 50 कोटी देण्यासंदर्भात हायकोर्टाने डीएसकेंना वेळोवेळी मुदत दिली होती. पण तरीही डीएसकेंना ही रक्कम भरण्यात अपयश आलं. त्यामुळे गेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने डीएसकेंना चांगलंच झापलं होतं.

“येताना रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या,” असं हायकोर्टानं बजावलं होतं.

त्यानंतर डीएसकेंकडून क्राऊड फंडिंग करुन पैसे उभारण्याचा प्रयत्न सुरु होते. पण ती रक्कम उभी करण्यात डीएसकेंना अपयश आल्याने, डीएसकेंकडून 12 कोटीच्या संपत्तीची कागदपत्रं हायकोर्टात सादर करण्यात आले.

संबंधित बातम्या

जेल की बेल? डी. एस. कुलकर्णींचा आज हायकोर्टात फैसला

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: DSK Presenting the court for auction of 12 crores worth of documents from
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV