आमदार नितेश राणेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

आमदार नितेश राणेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई: काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू इथल्या हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे.

खंडणी देण्यास नकार दिल्यानं नितेश राणे यांनी गुंड पाठवून तोडफोड केल्याचा आरोप केसवांनी यांनी केला आहे. दरम्यान, हॉटेलची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नितेश राणे, मोईन शेख आणि महमद अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

नितेश राणे हे हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांना भागीदारीसाठी धमकावत असल्याचा आरोप आहे. तसंच 10 लाख रुपयांची खंडणीही मागून, हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा दावा, केसवानींनी केला आहे.

जुहू परिसरात हॉटेल एस्टेला आहे. हे हॉटेल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निखील मिराणी आणि हितेश केसवांनी यांनी भागीदारीत सुरु केलं. मात्र या हॉटेलमध्ये आपल्यालाही भागीदारी मिळावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांची होती. पण त्याला मिराणी आणि केसवानींचा विरोध होता.

नितेश राणे यांनी भागीदारीसाठी तगादा लावला होता. मात्र या दोघांनीही सातत्याने नकार दिल्याने, नितेश राणे यांनी हॉटेल बंद करण्याची धमकी दिली, असं केसवाणींचं म्हणणं आहे.

गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास दोन जण हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी थेट तोडफोडीला सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी हॉटेलमधील ग्राहकांनाही धक्काबुक्की केल्याचं केसवाणींचं म्हणणं आहे.

या प्रकारानंतर केसवाणींनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. केसवाणींच्या तक्रारीनंतर नितेश राणेंविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

First Published: Saturday, 20 May 2017 12:08 AM

Related Stories

भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह
भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह

मुंबई : 5 वर्षांपूर्वी भंगलेल्या स्वप्नामध्ये, पुन्हा एकदा रंग

जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जीएसटीचा कायदा देश आणि राज्याच्या हिताचा असून, जीएसटीमुळे

कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात नितेश राणेही आक्रमक
कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात नितेश राणेही आक्रमक

मुंबई : कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात आमदार नितेश राणे

मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त
मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त

भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार

मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन
मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत

राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी
राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी

मुंबई : राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी मागणी मुंबई

मुंबई विमानतळावरील जीव्हीके टोलनाका शिवसेनेने बंद पाडला!
मुंबई विमानतळावरील जीव्हीके टोलनाका शिवसेनेने बंद पाडला!

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील एबीपी माझाच्या

अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल
अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल

करमाळी : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली तेजस ट्रेन काल गोवाच्या

मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक
मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक

मुंबई: मुंबईतून मागच्या १२ वर्षांपासून बेपत्ता असलेला व्यक्तीला

GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर
GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर

मुंबई : मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावे सुरु असणारी लूट कायम