शारीरिक संबंधांनंतर तरुणीची फेसबुक फ्रेंडकडून हत्या

फेसबुक फ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. मुंबईजवळील नालासोपारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शारीरिक संबंधांनंतर तरुणीची फेसबुक फ्रेंडकडून हत्या

मुंबई : फेसबुक फ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. मुंबईजवळील नालासोपारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव सुरु झाला, मात्र तिने डॉक्टरकडे जाण्यास नकार दिल्यानं 25 वर्षीय तरुणाने तिची हत्या केली.

वाशीमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची नालासोपाऱ्यातील हरीदास निरगुडे या 25 वर्षीय तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये चॅटिंगही सुरु होतं. अखेर त्यांनी नालासोपाऱ्यात भेटायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे काल रविवारी तरुणी वाशीहून नालासोपाऱ्याला तरुणाच्या घरी भेटायला आली. भेटीवेळी तरुणानं तरुणीकडे शरीरसंबंधांची मागणी केली. दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. मात्र तरुणीला रक्तस्त्राव सुरु झाला. तरुणाने तिला डॉक्टरकडे जाण्यास विचारलं. तरुणीने त्याला नकार दिला आणि निघण्याचा प्रयत्न केला. मात्र शूजची लेस गळ्याला आवळत तरुणाने तिची हत्या केली.

तरुणीची हत्या करुन हरीदासने तिचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावर पायऱ्यांशेजारी ठेवला. इमारतीतील रहिवाशांनी हा मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी इमारतीतील रहिवाशांकडे तरुणीबद्दल चौकशी केली, मात्र तिला कुणीही ओळखत नसल्याचं सांगितलं.

दरम्यान हरीदासच्या फ्लॅटमध्ये तरुणीच्या रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी हरीदासने आपणच तरुणीची हत्या केल्याचं कबूल केलं. तसंच आपण शारीरिक संबंध ठेवल्याचही कबूल केलं. हा तरुण नालासोपाऱ्यात आपल्या बहिणीसोबत राहात होता. ज्यावेळी हे दोघं भेटले त्यावेळी आरोपीची बहिण घरी नव्हती. तरुणाच्या बेडवरही रक्ताचे डाग आढळून आले आहेत.

वाशीमध्ये राहणारी ही तरुणी घरच्यांना न सांगता तरुणाला भेटायला आली होती. तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.  पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: facebook friend killed a girl in nallasopara
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV