लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा

लतादीदींचं नाव पाहून आपणही आर्थिक मदत केल्याची माहिती एकानं लतादीदींना दिली , आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी रेवती खरेविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रेवती खरे यांनी लता मंगेशकरांच्या नावानं बनावट निमंत्रणपत्रिका आणि लेटरहेड तयार केलं. अनेक कार्यक्रमांमध्ये रेवती या बनावट पत्रिका वाटायच्या, आणि लोकांकडून आर्थिक मदत घ्यायच्या.

लता दीदींचं नाव पाहून आपणही आर्थिक मदत केल्याची माहिती एकानं लतादीदींना दिली , आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

रेवती खरे या नालासोपारामध्ये राहत असून पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV