संघर्षयात्रेदरम्यान दोन शेतकऱ्यांचा सरकारला आत्महत्येचा इशारा

Farmer shouted slogans against govt in Nashik latest update

नाशिक: संघर्षयात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत दोन शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा इशारा दिला. संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विरोधक नाशिकजवळच्या पिंपळगाव बसवंत इथं पोहोचले. यावेळी ही घटना घडली.

 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचं बसवंत येथं भाषण सुरु होतं. तेव्हा दोन शेतकऱ्यांनी  सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर विखेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावलं. त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते. कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला.

 

‘सरकार कर्जमाफी देत नसेल तर, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.’ अशा घोषणा या शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, व्यासपीठावर आल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांच्या हातून विषाची बाटली आणि दोर कार्यकर्त्यांनी काढून घेतले. त्यानंतर स्टेजवरुन बोलताना शेतकऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

 

या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी दोनही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधकांनी त्यांची सुटका करण्यात यावी यासाठी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं.

 

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

 

संबंधित बातम्या:

 

उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी, विखे-पाटलांची जहरी टीका

 

 

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Farmer shouted slogans against govt in Nashik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: farmer Govt nashik shouted slogan
First Published:

Related Stories

VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!
VIDEO : औरंगाबादमध्ये एसटी बस नाल्यात अडकली!

औरंगाबाद : मराठवाड्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार

राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी
राम सत्यवचनी, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे? : राजू शेट्टी

नागपूर : राम सत्यवचनी होता, मग भक्त नरेंद्र मोदी असत्यवचनी कसे, याचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017   राज्यभरात पावसाचं दमदार

अमित शाहांचा पंचांग बघून भाकीत सांगण्याचा नवा उद्योग : शरद पवार
अमित शाहांचा पंचांग बघून भाकीत सांगण्याचा नवा उद्योग : शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्मिक भाषेत

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात

रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त  करण्यात आलं

नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा
LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा

ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या

राज्यभरात पावसाचं कमबॅक, बळीराजा सुखावला
राज्यभरात पावसाचं कमबॅक, बळीराजा सुखावला

उस्मानाबाद : ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के