मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार महागणार!

मुंबई महापालिकेच्या सभागृहात शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयांत लागू होईल. मात्र सीटीस्कॅन आणि एमआरआय सारख्या सेवा या शुल्कवाढीतून वगळण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार महागणार!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची रुग्णसेवा आता  महागणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबई बाहेरील रुग्णांसाठी तब्बल 30 टक्‍क्‍यांनी महाग होणार आहे, तर मुंबईतील नागरीकांसाठी 20 टक्के शुल्क वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेनं जरी आपल्या रुग्णालयात शुल्कवाढ केली असली तरीही जेष्ठ नागरीकांना यापुढेही महापालिका रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्कवाढ महापालिका रुग्णालयांत लागू होईल. मात्र सीटीस्कॅन आणि एमआरआय सारख्या सेवा या शुल्कवाढीतून वगळण्यात आल्या आहेत.

मुंबईतील पालिका रुग्णालयात मुंबईकरांसोबतच मुंबई बाहेरील रुग्णही  मोठ्या  संख्येने उपचार घेतात.  पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयावर पालिका वर्षाला 600 ते 700 कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी दहा टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत. तशीच अवस्था इतर रुग्णालयांची आहे. म्हणून पालिका रुग्णालयातील सेवा अद्ययावत करण्यासाठी शुल्कवाढीचा निर्णय घेतला जात आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fee hike for patients in bmc hospitals latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV