शिवसैनिकांची फाईट, पेडणेकर-कुसळे समर्थकांची हाणामारी

नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थक एकमेकांशी भिडले.

शिवसैनिकांची फाईट, पेडणेकर-कुसळे समर्थकांची हाणामारी

मुंबई: शिवसैनिकांमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचे समर्थक एकमेकांशी भिडले.

या समर्थकांची प्रचंड हाणामारी झाली. यामध्ये दोन शिवसैनिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

पक्षसंघटनेत झालेल्या बदलानंतर अनेक दिवसांपासून हा वाद सुरु होता. तो आज हातघाईवर आला.

शिवसेनेत अनेकांना पदं डावल्यानं रविवारपासून वरळी, डीलाईलरोड, भायखळा, प्रभादेवी, लालबाग परळ भागात अनेक शिवसैनिक नाराज होते. त्या नाराजीतून हा वाद उफाळून आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV