संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट, उपमहापौरासह 10 जणांवर गुन्हा

संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट, उपमहापौरासह 10 जणांवर गुन्हा

(डावीकडून) उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी, काँग्रेस नेता मेहबूब उर्फ बबलू अंसारी, स्थायी समिती सभापती इमरान वली मोहम्मद खान

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने भिडत असून एकमेकांचे जीव घेण्याचे प्रकार घडत आहेत. राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे पालिका गटनेते मनोज म्हात्रे यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच प्रभाग क्र. 2 मिल्लतनगर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवाराची हत्या करण्याचा कट विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह
दहा जणांच्या साथीने रचल्याचं उघड झाल्यानं शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सभापती इमरान वली मोहम्मद खान, काँग्रेस नेता मेहबूब उर्फ बबलू अंसारी, उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी, भरत पवार, फिरोज डायमंड, अर्शद अंसारी व त्यांचे चार अज्ञात साथीदार हे हत्येच्या कटातील आरोपी आहेत.

इमरान खान याने त्याची पत्नी व अहमद सिद्दीकी, मेहबूब अंसारी यांचं पॅनल तयार केलं आहे. या पॅनलच्या विरोधात समाजसेवक हमीद सत्तार शेख यांनी पॅनल तयार करुन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. हमीद शेख यांच्या पॅनलकडून आपल्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने त्याला कायमचं संपवण्याचा कट रचून अंबरनाथच्या गुंडांना सुपारी दिली होती.

हमीद शेख ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजमध्ये लिपिकाचे काम करत असल्याने त्याला रस्त्यातच गाठून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. या हत्येच्या कटाचे मोबाईल रेकॉर्डिंग हमीद शेख यांचा समर्थक ननका गुप्ता याने उपलब्ध केल्याने हत्येच्या कटाची घटना सुदैवाने उघडकीस आली आणि मनोज म्हात्रेंसारख्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

First Published:

Related Stories

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिका निवडणूक निकाल काही तासांवर
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिका निवडणूक निकाल काही तासांवर

मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी मतमोजणी होणार आहे.

वीज पडून एकाचा मृत्यू, अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर
वीज पडून एकाचा मृत्यू, अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर

अहमदनगर : मान्सूनपूर्व पावसाने अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह

‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं!
‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना...

कोल्हापूर: बेळगावात ‘जय महाराष्ट्र’विरोधी फतव्याच्या निषेधार्थ

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/05/2017

लातूरहून मुंबईला येताना मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं,

जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होतो: सदाभाऊ खोत
जो तो आपल्या कर्तृत्वानं मोठा आणि छोटा होतो: सदाभाऊ खोत

पिंपरी-चिंचवड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश

शेट्टींच्या आत्मक्लेश पदयात्रेला सांगलीच्या गावागावातून खर्डा-भाकरीची शिदोरी
शेट्टींच्या आत्मक्लेश पदयात्रेला सांगलीच्या गावागावातून...

सांगली : खासदार राजू शेट्टी यांच्या पुणे ते मुंबई आत्मक्लेश

डुकरं पकडण्याच्या बिलावरुन गोंधळ, पवारांच्या बारामतीत भ्रष्टाचार?
डुकरं पकडण्याच्या बिलावरुन गोंधळ, पवारांच्या बारामतीत भ्रष्टाचार?

बारामती : बारामती नगरपालिकेने शहरातील भटकी डुकरे पकडण्यासाठी

गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी
गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी

पुणे: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी

दहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेली बॅग सामानासकट सापडली
दहा वर्षांपूर्वी चोरीला गेलेली बॅग सामानासकट सापडली

जळगाव : रेल्वे प्रवासात चोरीला गेलेलं सामान प्रत्येकाला मिळेलच असं

महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप :...

लातूर : “ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा