फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे

कल्याण आणि डोंबिवली शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह 8 ते 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली.

मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपली.

फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत राज ठाकरेंची डेडलाईन संपली


मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे कार्यालयात आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं होतं.

PHOTO : ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड


15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. 15 दिवसात तसं न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असंही राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं.

पाहा व्हिडिओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: hawkers MNS फेरीवाले मनसे
First Published:
LiveTV