अहमदनगरमध्ये धावत्या रिक्षाला आग, तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगरच्या नेवसा फाट्याजवळ एका सीएनजी रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदनगरमध्ये धावत्या रिक्षाला आग, तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर : अहमदनगरच्या नेवसा फाट्याजवळ एका सीएनजी रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेट घेतलेल्या रिक्षातील तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल (सोमवार) रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. मुळचे औरंगाबादचे असलेले रहिवासी चांदा गावात साखरपुड्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडली.

या रिक्षातून एकूण पाच जण प्रवास करत होते. यामधील नमीरा शफीक कुरेशी आणि महेवीश आतीक कुरेशी आणि जुनेद शफीक कुरेशी या तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर समीर हनीफ कुरेशी, रफीक हाजी जाफर कुरेशी, हे यात गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire at auto rickshaw in Ahmednagar the death of both latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV