भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

व्होल्टास कंपनीच्या एसी, फ्रिज आणि पंख्याच्या 4 गोदामालाही आगीने आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं आहे.

भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतल्या इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. केमिकल गोदामाला लागलेली आग मोठी असल्यानं परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे.

या आगीनं बाजूच्याच व्होल्टास कंपनीच्या एसी, फ्रिज आणि पंख्याच्या 4 गोदामालाही आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं आहे.

घटनास्थळी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगरमधील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire breaks at chemical company in bhiwandi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV