भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग

माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली.

भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग

भिवंडी : माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली.

प्लॅस्टिक आणि कच्च्या मालाची ही गोदामं आहेत. आगीने अल्पावधित रौद्र रुप धारण केल्याने आग भडकत आहे.

आगीची माहिती मिळताच ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडी अशा महापालिकेतील अग्निशमन दलाने धाव घेतली आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

भिवंडी नारपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सागर कॉम्प्लेक्समधील चेकपॉईंट या कंपनीसह डझनभर गोदामांना आग लागली. आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या परिसरातील सर्व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जवळपास डझनभर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीचं भीषण रुप पाहता, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

https://twitter.com/abpmajhatv/status/938311832967708672

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire breaks out at 11 godowns in Bhiwandi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: bhiwandi FIRE godown आग भिवंडी
First Published:
LiveTV