मुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजल्याच्या इमारतीला आग

मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील ‘लिजेंड’ या इमारतीतील एक फ्लॅटला आग लागल्याची प्राथमिक वृत्त नुकतंच हाती आलं आहे.

मुंबईतील वाळकेश्वरमध्ये 31 मजल्याच्या इमारतीला आग

मुंबई : मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील ‘लिजेंड’ या इमारतीतील एक फ्लॅटला आज (सोमवार) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. पण वेळीच अग्निशमन दलानं ही आग विझवली.

ही इमारत 31 मजल्यांची असून 17 आणि 18 व्या मजल्यावरील डुप्लेक्स फ्लॅटला आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.

या इमारतीतील अनेक फ्लॅट हे सध्या रिकामेच आहेत. पण काही फ्लॅटमध्ये केअर टेकरही होते. त्यामुळे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील लोकांना बाहेर काढलं होतं.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली होती याबाबत मात्र कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire in a 31 floor building in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV