मुंबईतील अंधेरीमध्ये प्रिंटींग प्रेसला आग, एकाचा मृत्यू

मुंबईतल्या आग लागण्याच्या मालिकेत एक नवी भर पडली आहे. अंधेरीच्या मरोळ परिसरातल्या मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन या प्रिंटींग प्रेसला काल (बुधवार) रात्री आग लागल्याची घटना घडली.

मुंबईतील अंधेरीमध्ये प्रिंटींग प्रेसला आग, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतल्या आग लागण्याच्या मालिकेत एक नवी भर पडली आहे. अंधेरीच्या मरोळ परिसरातल्या मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडिया वन या प्रिंटींग प्रेसला काल (बुधवार) रात्री आग लागल्याची घटना घडली.

या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रिंटींग प्रेसच्या आजूबाजूला जागा नसल्याने लोकांची बाहेर पडण्यासाठी पळापळ झाली. यामध्येच प्रदीप विश्वकर्मा आत अडकून पडले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.

फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या आणि 5 पाण्याच्या टँकरच्या मदतीनं बऱ्याच वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fire in printing press at Andheri, one death latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV