मुंबईतील सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्याला आग

कमला मिल अग्नितांडवाची घटना ताजी असताना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली.

मुंबईतील सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्याला आग

मुंबई : मुंबईतील आगीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. कमला मिल अग्नितांडवाची घटना ताजी असताना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली.

मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या तिथं अग्निशमन दलाचं कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, सकाळची वेळ असल्यामुळे न्यायालयाची ही इमारत बंद होती. त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fire in the third floor of the Sessions Court in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV