मुंबईत प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला आग, दोन स्टुडिओ खाक

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीत स्टुडिओ जळून खाक झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल झाल्या होत्या.

मुंबईत प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला आग, दोन स्टुडिओ खाक

मुंबई : चित्रपटसृष्टीचे शोमॅन अशी ओळख असलेल्या राज कपूर यांच्या सुप्रसिद्ध आर.के. स्टुडिओला शनिवारी आग लागली. मुंबईतील चेंबुर परिसरात असलेल्या स्टुडिओला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत स्टुडिओ 1 आणि स्टुडिओ 2 आगीत जळून खाक झाले.

अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर काही काळ कूलिंग ऑपरेशन सुरु होतं. शॉर्ट सर्किटमुळे स्टुडिओला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

आगीच्या ज्वाळांमध्ये स्टुडिओचं छत कोसळल्याचीही माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी या स्टुडिओत 'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमाचं चित्रिकरण सुरु होतं.

आगीत स्टुडिओमधील शूटिंगचं बरंचसं सामान जळून खाक झालं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या आगीमुळे चेंबूर नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सायन फ्रीवे तसंच नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली.

LIVE UPDATE :

- शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती


- आगीत शूटींगचं सामान जळून खाक


- आगीमुळे आर.के. स्टुडिओची वास्तू कोसळली

- अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आर.के. स्टुडिओत जाण्यात यश

- आगीवर नियंत्रण, कुलिंग ऑपरेशन सुरु

- सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

- स्टुडिओतील लाकडी सामानाचं मोठं नुकसान

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: FIRE R.K. Studio आग आर.के.स्टुडिओ
First Published:
LiveTV