मीरा भाईंदर महापालिकेतील पाच विद्यमान नगरसेवक शिवसेनेत

मीरा भाईंदर महापालिकेतील पाच विद्यमान नगरसेवक शिवसेनेत

मुंबई : राज्यातील प्रमुख दहा महापालिकांतील निवडणुकीची रणधुमाळी संपून महिनाही उलटला नाही, तोच राजकीय पक्षांना मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मीरा-भाईंदरमधील 5 विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हातावर शिवबंधन बांधणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कोणकोणत्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश?

दिनेश नलावडे (काँग्रेस)
राजू वेतोस्कर (काँग्रेस)
वंदना पाटील (राष्ट्रवादी)
अनिता पाटील (राष्ट्रवादी)
अरविंद ठाकूर (मनसे)

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे, मात्र आतापासून सर्वांनी तयारीला सुरुवात केलेली दिसत आहे. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत युती करणार का? या प्रश्नावर अद्याप निर्णय झाला नसल्याचं उत्तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV