सरकारची आयडिया, खाण्यास अयोग्य बर्फाचा रंग बदलणार!

दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारची आयडिया, खाण्यास अयोग्य बर्फाचा रंग बदलणार!

मुंबई: रस्त्यावरील-फेरीवाल्यांकडील थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, आता अन्न आणि औषध प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे.  जेणेकरुन असा बर्फ थंडपेयात वापरला जाऊ नये, तसंच जर तो वापरला असेल, तर ते तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे.

यावर्षी मे महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाहणी करुन, रस्त्यावरील बर्फाचे 74 टक्के नमुने दूषित असल्याचं उघड केलं होतं.

यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने अशा बर्फाला प्रतिबंध म्हणून त्याचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याबातचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे, सरकारने जर त्याला हिरवा कंदील दिला, तर राज्यभरात हे लागू केलं जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

स्पेशल रिपोर्ट : मुंबईतील फेरीवाल्यांकडे ई कोलाय विषाणूयुक्त दूषित बर्फ


सध्या फेरीवाले किंवा रस्त्यावरील थंडपेय विक्रेते कमी किमतीतील बर्फ घेऊन, तो थंडपेयामध्ये वापरतात. मात्र हा बर्फ दूषित असल्याने, त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गॅस्ट्रो, जुलाब यासह अनेक आजारांना सामोरं जावं लागतं.

खाण्यायोग्य बर्फ हा पिण्याच्या पाण्याद्वारे बनवला जातो. तर मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होणारा बर्फ हा कोणत्या पाण्यातून बनवला जातो, हे आपण कोणीही सांगू शकत नाही.

शिवाय मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या बर्फाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. जसा मृतदेह टिकवण्यासाठी, औषधांच्या संवर्धनासाठी वगैरे उपयोग होतो.

मात्र हाच बर्फ कमी किमतीत मिळत असल्याने फेरीवाले तो थंडपेयात वापरत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता असा बर्फ पेयांमध्ये वापरला जाऊ नये, म्हणून त्याला निळा रंग देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

रस्त्यावरच्या ज्यूस-गोळ्यातलं 74 टक्के पाणी दुषित : BMC

स्पेशल रिपोर्ट : मुंबईतील फेरीवाल्यांकडे ई कोलाय विषाणूयुक्त दूषित बर्फ 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV